॥ श्री व्यंकटेश आरती ॥

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।

सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ॥

कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा ।

कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।

केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ॥

हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातो मी तू ते ।

दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ॥

देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते ।

ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ॥

॥ इति श्री व्यंकटेश आरती संपूर्णम् ॥