घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।
गुरुवंदना
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ।।
प्रार्थना
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणे देह माझा पडावा ।।
उपेक्ष नको गुणवंता अनंता । रघू नायका मागणे हेच आता ।।
उपासनेला दृढ चालवावे । भूदेव - संतासी सदा नमावे ।।
सत्कर्म योगे वय घालवावे । सर्वांमुखी मंगल बोलवावे ।।