॥ श्री गणपतीची आरती ॥

गजानना, श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती, श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग

चंदनउटी खुलवी रंग

बघता मानस होते दंग

जीव जडला चरणी तुझिया

आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा

देवा कृपेच्या तू समुद्रा

वरद‌विनायक करुणागारा

अवधी विघ्ने नेसी विलया

आधी वंदू तुज मोरया